पिंपरी: विद्युत रोहित्राच्या स्फोटात नारळाचे झाड जळून खाक

पिंपरी – विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एक नारळाचे झाड जळून खाक झाले. तसेच इमारतीच्या टेरेस वरील काही साहित्यही जळाले. ही घटना पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटी येथे रविवारी सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास घडली.

रोझलँड सोसायटीमधील नागरिकांनी ३० अग्निरोधक सिलेंडरचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशामक दलही वेळेवर दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यास उत्सुक असलेल्या क्रिकेट प्रेमींच्या आनंदावर पाणी पडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.