#T20WorldCup #INDvPAK | कोहलीचे दमदार अर्धशतक; भारताचे विजयासाठी पाकिस्तानसमोर 152 धावांचे आव्हान

कर्णधार विराट कोहलीचं शानदार अर्धशतक आणि ऋषभ पंतने फटकावलेल्या ३९ धावांच्या जोरावर भारतीय संघाने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान समोर विजयासाठी 152 धावांचं लक्ष्य ठेवलं.

तत्पूर्वी हायहोल्टेज सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय संघाला पहिल्याच षटकात रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का दिला, रोहितला भोपळाही फोडता आला नाही. त्यापाठोपाठ लोकेश राहुल देखील 3 धावा करून बाद झाला. दोघांना शाहीन आफ्रिदीने बाद केलं.

दरम्यान सूर्यकुमार यादवने विराट कोहलीसोबत मिळून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सूर्यकुमार यादव (11) हसन अलीच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने कोहलीच्या साथीत शानदार फटकेबाजी करत भारताची धावसंख्या वाढवली. कोहली आणि पंतने चौथ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी रचली. मात्र शादाब खानच्या चेंडूवर रिषभ पंत बाद झाला. त्याने 30 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या.

पंतनंतर फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजाने कोहलीला सुरेख साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. अठराव्या षटकांत हसन अलीच्या चेंडूवर १३ धावा करून बाद झाला. मात्र कोहलीने 49 चेंडूंत 1 षटकांर 5 चौकारांच्या मदतीने 57  धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 11 धावा केल्या. त्यामुळे भारताला २० षटकांत  7 बाद 151 धावापर्यंत मजल मारता आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.