- 505 रुग्णांची नोंद
- उपचाराधीन रुग्णांची संख्या 3778
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज करोनाने पुन्हा एकदा नवीन वर्षातील उच्चांक गाठला आहे. आज शहरामध्ये तब्बल 505 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील रुग्णसंख्या वाढत असली तरी शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण नगण्य असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. आज बाधित आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या ही भोसरीमध्ये आढळली आहे. तर आजपर्यंत शहरामध्ये 1 लाख 6 हजार 728 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 483 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शहराबाहेरील 22 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात एकाही करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण कमी असल्यामुळे दिलासा मिळत आहे. आतापर्यंत 2676 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1850 तर शहराबाहेरील 776 इतक्या रुग्णांचा समावेश आहे. आज भोसरी परिसरामध्ये सर्वाधिक 97 रुग्णांची नोंद झाली आहे.
आज दिवसभरामध्ये 155 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 100 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3832 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 918 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 1398 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 2380 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 3778 इतकी आहे.
रुग्णालय झोननुसार रुग्णांची संख्या
आकुर्डी-51-
भोसरी-97-
जिजामाता-53-
सांगवी-59-
तालेरा-95-
थेरगाव-42-
यमुनानगर-78-
वायसीएम-25-
जिल्हा रुग्णालयात 16 जणांची प्रकृती चिंताजनक
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात सध्या 41 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 16 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयामध्ये बुधवारी (दि. 3) 3 करोनाबाधित रुग्ण आढळले. रुग्णालयामध्ये आतापर्यंत एकूण 2 हजार 14 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील 798 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 173 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 307 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. 695 जणांना होमक्वॉरंटाइन केले आहे.