दिल्ली महापालिका पोटनिवडणुकीत ‘आपचा’च बोलबाला; भाजपला मात्र भोपळा

नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने पाच पैकी चार जागा जिंकून आपला झेंडा पुन्हा फडकावला आहे. उर्वरीत एक जागा कॉंग्रेसला मिळाली पण भाजपला एकही जागा मिळू शकली नाही. दिल्ली महापालिकेची पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक आहे त्यामुळे या पोटनिवडणुकीला महत्व होते.

या पाच पैकी एक जागा पुर्वी भाजपकडे होती, ती त्यांना राखता आली नाही. आम आदमी पक्षाने कल्याणपुरी, रोहिणी, त्रिलोकपुरी, आणि शालीमार बाग उत्तर या वॉर्डातील जागा जिंकल्या तर चौहान बांगर वॉर्डात कॉंग्रेस उमेदवार विजयी झाला.

तेथे भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेला. या विजयाबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे की, लोक आता भाजपच्या कारभाराला कंटाळले असून येथील पुढील सार्वत्रिक निवडणुकीत ते प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभे राहतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.