पालखी सोहळ्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

पिंपरी – संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्‍त विनायक ढाकणे यांनी दिली आहे.

सोमवार (दि.25)

वाहतूक पोलीस विभागांनी दिलेल्या सूचनांनुसार सोमवारी दि. 25 जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू येथून भक्‍ती-शक्‍ती चौकात येईपर्यंत मुंबईकडून येणाऱ्या सर्व वाहनांनी किवळे मार्गे कात्रज बायपास या मार्गाचा वापर करावा, तसेच पिंपरी-चिंचवडमधून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भक्‍ती-शक्‍ती चौक येथून भेळ चौक, संभाजी चौक रावेत मार्गाचा वापर करायचा आहे. तसेच पुणेकडून मंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी खंडोबामाळ चौकातून डावीकडे वळून चापेकर चौक रावेत मार्गाचा वापर करायचा आहे. निगडी ट्रान्सपोर्टनगर येथून भक्‍ती-शक्‍ती चौकाकडे येणारी सर्व वाहतूक बंद करुन ती रावेत मार्गाने वळविण्यात येणार आहे. मुंबईकडून भोसरीकडे जाणाऱ्या सर्व वाहन चालकांनी त्रिवेणीनगर, थरमॅक्‍स चौक मार्गाचा, तसेच चिंचवड किंवा वाकडकडे जाण्यासाठी भेळ चौक, संभाजी चौक मार्गाचा , म्हाळसाकांत चौक ते टिळक चौक मार्गावरुन जाण्यासाठी म्हाळसाकांत चौक, खंडोबाचा माळ, संभाजी चौक, बिजलीनगर, चिंचवडे फार्म ते रावेत या मार्गाचा तसेच ग्रेडसेपरेटरमधून बाहेर पडणारी वाहतूक खंडोबामाळ चौकातून चापेकर चौक किंवा थरमॅक्‍स चौक मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

मंगळवार (दि.26)

संत तुकाराम महाराजांची पालखी शनिवारी (दि. 26) आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर येथून पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. त्यासाठी भक्‍ती-शक्‍ती चौक ते नाशिक फाटा चौक, ग्रेड सेपरेटरच्या डाव्या बाजूचा रस्त्यासाठी पर्यायी रस्ता तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांकरिता भक्‍ती-शक्‍ती चौक ते ग्रेड सेपरेटरमार्गे नाशिक फाटा, सर्व्हिस रोडवरून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांकरिता प्राधिकरण, भक्‍ती-शक्‍ती चौक ते थरमॅक्‍स चौक मार्गे टेल्को रोड व अंतर्गत रस्ता व थरमॅक्‍स चौक ते खंडोबाचा माळसाठी पर्यायी रस्ता वापरावा. केएसबी चौक किंवा दुर्गा देवी चौक, टेल्को रोडवरून वाहतूक सुरु ठेवण्यात येईल. एसकेएफ लिंकरोडचा वापर करावा. पुण्याकडे जाण्यासाठी चापेकर चौक, डांगे चौक, काळेवाडी फाटा, साई चौक मार्गे नाशिक फाटा याचा वापर करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.