‘पीवायसी’ उपांत्य फेरीत विजयी

पिंपरी -स्पार्क स्पोर्टस अकादमीतर्फे घेण्यात येत असलेल्या “स्पार्क चषक’ क्रिकेट स्पर्धेत उपांत्य सामन्यात “पीवायसी’ संघाने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

या सामन्यात गोलंदाज आर्य जाधव हा सामन्याचा मानकरी ठरला. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पीवायसी संघाने ऐश्‍वर्य अकादमीवर 118 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात साहिल मदान, सोहम शिंदे यांच्या फलांदाजीच्या जोरावर संघाने दोनशे धावसंख्येचा टप्पा आलांडला होता. त्यांनतर आर्य जाधव याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी संघाने सहज विजय मिळवला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.