बॉलीवुड अभिनेत्री कंगना रानौत आणि राजकुमार राव यांच्या चाहत्यांना ‘मेंटल है क्या’ या सिनेमाची प्रतिक्षा होती. पण आता ही प्रतिक्षा अखेर संपली असून यावर्षी 21 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अभिनेता राजकुमार राव याने या सिनेमाचं नवीन पोस्टर सोशल मिडियावर शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. कंगना आणि राजकुमार हे क्वीन या चित्रपटानंतर आता ‘मेंटल है क्या’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात कंगना आणि राजकुमारव्यतिरिक्त जिमी शेरगिल आणि अमायरा दस्तूर या दोघांच्याही भूमिका आहेत. जिमीनं याआधी कंगनासोबत ‘तनु वेड्स मनु’ सिनेमामध्येही काम केलं आहे.
Madness has made its cut! Catch Mental Hai Kya in theatres on 21st June 2019. #MentalHaiKya #MentalHaiKyaOn21stJune#KanganaRanaut @ektaravikapoor @pkovelamudi@RuchikaaKapoor @ShaaileshRSingh @KanikaDhillon pic.twitter.com/pvsobuTn3E
— Rajkummar Rao (@RajkummarRao) April 17, 2019
‘मेंटल है क्या’ची निर्मिती एकता कपूर करत असून सिनेमाची कथा मानसिक आरोग्य बिघडलेल्या लोकांच्या जीवनावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.
‘मेंटल है क्या’ची रिलीज डेट याआधी अनेकदा बदलण्यात आली. याआधी 22 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता मात्र नंतर या तारखेत बदल करण्यात आला आणि 29 मार्च ही तारीख सांगण्यात आली होती. पण आता या सिनेमाची नवीन तारीख समोर आली असून हा सिनेमा अखेर 21 जूनला बॉक्सऑफिसवर झळकणार असल्याचे निश्चित झाले आहे.