‘व्हिजिटर’ व्यवस्थापनाची ‘सिस्टीम’ अद्ययावत करण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारसमोरील “व्हीजीटर’ व्यवस्थापनाची सिस्टीम अद्ययावत करण्याची मागणी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी केली आहे. त्यासाठी दोन संगणक संच उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांची सर्व माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे. याबाबत माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांना निवेदन देण्यात आले आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत महापालिकेची चार मजली प्रशासकीय इमारत आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेता यासह विविध विषय समित्यांच्या सभापतींची दालने आहेत. या इमारतीमध्ये शहरातील नागरिक आपल्या विविध कामांसाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी दररोज येत असतात.

पुन्हा जुनी पद्धत

या नागरिकांची नोंद घेण्यासाठी हस्तलिखित गेट पास देण्यात येत आहे. सन 2012 ते 2016 या काळात गेट पास संगणकीय मशिनद्वारे दिला जात होता. संगणक जुना झाल्याने, त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे पुन्हा हस्तलिखित गेट पास देण्यात येत आहे. या सिस्टीमच्या सक्षमीकरणासाठी व्हिजिटर व्यवस्थापन सिस्टीम सॉफ्टवेअरसह दोन संगणक संच सुरक्षा विभागास उपलब्ध करुन देण्यात यावे. या सॉफ्टवेअर यंत्रणेमध्ये व्हिजिटरच्या फोटोची सोय असावी. त्याचबरोबर व्हिजिटरचा डेटा भरण्यासाठी त्यांची संपूर्ण माहिती घेण्याची व्यवस्था असावी. सोयी-सुविधा देऊन व्यवस्था अद्यावत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.