पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा रविवारचा चौथा दिवस होता. महापालिकेने पुनावळे येथे रहिवासी भागात कचरा डेपो आणण्याचा घाट घातला आहे. यास स्थानिक रहिवासी आणि आयटीयन्सचा विरोध आहे. रविवारची सुट्टी असल्याने अनेक आयटीयन्सने या आंदोलनास मोठ्या संख्येने पाठिंबा दिला.
यावेळी तुषार कामठे म्हणाले कि, कचरा डेपो विरोधात कोर्टात जाणार असून स्थागितीची ऑर्डर आणणार आहे. मोठ्या प्रकल्पाऐवजी छोटे प्रकल्प राबवावेत, जेणेकरून कचऱ्याची वाहतूक करण्याचा ताण कमी होईल. सोबतच आयुक्तांशी चर्चा करून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी बोलणी करणार आहे. हा प्रकल्प रद्द केला नाही, तर आमरण उपोषण करणार आहे.
त्या प्रसंगी माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, सरचिटणीस जयंत शिंदे, शकुंतला भाट, प्रदेश सरचिटणीस राजन नायर, समन्वयक गणेश भोंडवे, अशोक तनपुरे, काशिनाथ जगताप, सागर चिंचवडे, विजयकुमार पिरंगुटे, विवेक विधाते, संतोष माळी, राजेश हरगुडे, सुशील घोरपडे, मुख्य प्रवक्ते माधव पाटील आदी उपस्तिथ होते.