पिंपळे जगतापचे क्वारंटईन सेंटर नावापुरतेच

७० बेडचे सेंटर धूळखात : तालुक्यात करोना बधितांचा आकडा दोन हजार पार

– विशाल वर्पे 

केंदूर – शिरूर तालुक्यात करोना रुग्णांचा आकडा दोन हजार पार झालेला आहे मात्र पिंपळे जगताप (ता. शिरुर) याठिकाणी शासनाने तब्बल सत्तर बेडचे क्वारंटईन सेंटर उभारून देखील धूळ खात पडले आहे.

पिंपळे जगताप आणि केंदूर परिसरात आत्तापर्यंत दोनशेहून अधिक रुग्ण करोना बाधित सापडले आहेत त्यापैकी अनेक रुग्णांनी करोनावर मात केली मात्र अजूनही जवळपास नव्वद ते शंभर रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना खाजगी दवाखान्याचा खर्च परवडत नसून देखील बेड अभावी खाजगी दवाखान्यात लाखो रुपये खर्च करून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, पिंपळे जगताप येथील एका शैक्षणिक संस्थेची इमारत क्वारंटईन सेंटरसाठी प्रशासनाने ताब्यात घेतली दीड महीना उलटून गेला मात्र अद्यापही या क्वारंटईन सेंटरमध्ये एकाही रुग्णाला उपचार देण्यात आले नाहीत की क्वारंटईन करण्यात आले नाही सत्तर बेडचे हे क्वारंटईन सेंटर फक्त नावपूरतेच उभारून ठेवले का असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. शिरूर तालुक्यात आत्तापर्यंत तब्बल सत्तरहुन अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पिंपळे जगताप येथील उभारलेले सत्तर बेडचे क्वारंटईन सेंटर कधी सुरू होणार आणि कधी या भागातील रुग्णांना उपचार मिळणार असा सवाल आता या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.