मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) यांना ओळखले जाते. दोघांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर देखील ही जोडी सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा आपल्या पोस्टद्वारे हे दोघे प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर दोघांचे रोमॅंटिक अंदाजातील काही फोटो शेअर केले आहे.
प्रियाने उमेशसोबत दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा उमेशसोबत रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला आहे. प्रिया उमेशला किस करत असून त्याच्या चेहऱ्यावर हसू तर दुसऱ्या फोटोत आश्चर्य असल्याचे भाव दिसून येत आहे. प्रियाने या पोस्टला ‘सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं मला भयंकर आवडतं’ असं कॅप्शन दिलं आहे. तर पुढे तिने तळटीप म्हणत ‘खूप आवडीच्या गोष्टीला “भयंकर आवडणे” ही उपमा माझी काकू द्यायची. “भयंकर” या शब्दाचा असाही वापर,’ असे लिहीले आहे.
दोघांचा हा क्युट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टला नेटकऱ्यांची देखील पसंती मिळाली आहे. काही नेटकऱ्यांनी ‘अगदी बरोबर’, ‘काय वाईट आहे त्यात?’ अशा कमेंट करत प्रियाला पाठिंबा दिला आहे. प्रियाचं प्रेम व्यक्त करण्याची ही स्टाइल नेटकऱ्यांनाही आवडलेली दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, प्रिया आणि उमेशची जोडी अनेकांच्या पसंतीस पडते. ही जोडी कायमच हिट ठरते. अनेक वर्ष डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मागील अनेक वर्षांपासून दोघंही एकमेकांची साथ भक्कमपणे निभावत आहेत. सध्या हे गोड कपल ‘जर तर ची गोष्ट’ नाटकातून रसिकांचं मनोरंजन करत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.