Amruta Fadnavis : मुंबईत काल अनेक सार्वजनिक गणेश उत्सवातील मूर्ती आणि घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन पार पडले. जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन केले जाते. त्यात निर्माल्य, इतर प्रकारचा कचरा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी जमा झाल्या होत्या. तेच निर्माल्य स्वच्छ करण्याचे काम अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केले.
दरम्यान, चौपाटीवर जमा झालेल्या निर्माल्याची योग्य रित्या स्वच्छता करण्यासाठी आज सकाळी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) चौपाटीवर सकाळी झाल्या होत्या. दरम्यान, यावेळी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी घातलेला ट्रॅक सूट, हातमोजे आणि गॉगल असा त्यांचा लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी जुहू चौपाटी या ठिकाणी असलेल्या इतर स्वयंसेवकांसह स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही आले होते. त्यांचीही भेट अमृता फडणवीस यांनी घेतली. स्वच्छता मोहिमेत अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी जो सहभाग घेतला ते फोटो व्हायरल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरच्या गणपतीची आरती करुन गणरायाला काल निरोप दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या जुहू चौपाटीवरच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या मागच्या वर्षीही याच प्रकारे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.