तेल अविव – अलिकडच्या काळात प्रादुर्भाव वाढलेल्या डेल्टा व्हेरिएंटला रोखण्यासाठी फायझरची लस कमी परिणामकारक आहे, असा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलमधील फायझरची लस घेललेल्या 64 टक्के नागरिकांना 6 जून ते जुलैच्या पूर्वार्धात करोनाची लागण झालेली नाही, असे इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र त्यापूर्वी हे प्रमाण 94 टक्के इतके होते. नव्याने प्रादुर्भाव होत असलेल्या डेल्टा व्हेरिएंटमुळे करोना पासून सुरक्षित असलेल्यांचे हे प्रमाण घटले आहे.
त्याचबरोबर इस्रायलमध्ये जून महिन्याच्या प्रारंभापासून विविध निर्बंध उठवले गेले आहेत. त्यामुळेही करोनाचा संसर्ग वाढला असल्याचा निष्कर्श काढला जाऊ लागला आहे. फायझरच्या लसीमुळे नागरिकांचे गंभीर आजारापासून आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून बचाव झाला आहे,असे सरकारी आकडेवारीवरून दिसते आहे. फायझरची लस टेल्टा व्हेरिएंटवर कमी परिणामकारक असल्याच्या इस्रायलच्या दाव्यावर फायझर कंपनीच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.