नवी दिल्ली- लॉकडाऊनच्या काळात 83 दिवस तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढकेली नव्हती. मात्र नंतर तेल कंपन्यानी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 दिवसापासून सुरू केली आहे. ही दरवाढ आगामी दोन आठवडे तरी चालू राहण्याची शक्यता आहे.
मात्र आता तेल कंपन्या ही दरवाढ कमी प्रमाणात करण्याची शक्यता आहे. अगोदर ही दरवाढ 50 पैशांपेक्षा जास्त केली जात होती. आता ती 30 ते 40 पैसे केले जाण्याची शक्यता असल्याचे तेल कंपन्यांनी सूचित केले आहे. तेल कंपन्यांनी आतापर्यंत 10 दिवसात प्रति लिटरला पाच रुपयांची वाढ केली आहे. आणखी तीन रुपयांची वाढ पुढील दोन -तीन आठवड्यात केली जाण्याची शक्यता आहे.
ही दरवाढ केली तरच जुलै महिन्यानंतर तेल कंपन्यांना प्रति लिटरला एक रुपया पेक्षा जास्त मार्जीन मिळू शकणार आहे. सहा जून रोजी तेल कंपन्यांना प्रतिलिटर मागे 1 रुपया 28 पैशाचा तोटा होत होता. आता प्रतिलिटर मागे 2 पैशांचा नफा होऊ लागला आहे. केंद्र सरकारने मध्यंतरी प्रति लिटरला 10 ते 13 रुपयांनी उत्पादन शुल्क वाढविल्यामुळे कंपन्यांच्या या आकडेवारीवर परिणाम झालेला आहे.
विशेष म्हणजे केंद्र सरकारने उत्पादन शुल्क वाढविले असले तरी मध्य प्रदेश वगळता इतर राज्यांनी आतापर्यंत तरी मूल्यवर्धित करात वाढ केलेली नाही. जर राज्यानी मूल्यवर्धित करात वाढ करण्यास सुरुवात केली तर ग्राहकांना स्वस्त इंधन मिळण्याची शक्यता कमी होणार आहे.