शिरूर-हवेलीचे लोकप्रिय आमदार ऍड. अशोक बापू पवार यांनी राज्यातील विकासांमध्ये रोल मॉडेल म्हणून लौकीक मिळविला आहे. अशोक पवार यांनी मतदारसंघात सर्वसामान्य आणि गरजू घटकांसाठी दूरगामी विचार करून अनेक योजना प्रत्यक्षात साकारल्या आहेत. याच योजना राज्यासाठी पथदर्शक ठरल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वास अनेक पैलू आहेत.
लोकाभिमुख नेता आणि सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या बापूंची जनसामान्यांमध्ये ओळख ही सर्वसामान्यातील असामान्य, अशी बनली आहे. समाजभान जपत जनसामान्यांची नाळ जोडून बापूंनी शिरूर- हवेलीचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला आहे. बापूंनी भौगोलिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या नावाजलेल्या या मतदारसंघाची ओळख राज्याला पुन्हा नव्याने करून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
आरोग्य क्षेत्रात कामगिरी
राज्य शासनाकडून नाममात्र भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या जागांवर अनेक दवाखाने उभे राहिले आहेत. या रुग्णालयाकडून दरवर्षी गोरगरिबांना मोफत उपचाराची सुविधा मिळत होती. परंतु सुविधेचा वापर योग्य पद्धतीने केला जात नव्हता. पंधरा वर्षांपासून शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी धर्मादाय आयुक्त, राज्य शासन, जिल्हा प्रशासन यांच्याशी चर्चा व पाठपुरावा केला.
त्यांनी गोरगरिबांचा दोन लाखांपर्यंतचा वैद्यकीय उपचाराचा खर्च माफ करून दिला आहे. शिरूर-हवेलीतील कोट्यवधी रुपयांची वैद्यकीय सुविधा गोरगरिबांना मिळवून देण्यात बापू यशस्वी झाले आहेत. आजही गावोगावी वैद्यकीय सुविधेचा लाभ अल्प उत्पन्न गटातील लोक घेत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित हॉस्पिटलमधील सुविधा आणि योजना पोहोचवून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
रस्त्यांची गुणवत्ता सुधारली
गावोगावी, वाड्या- वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तथा राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून रस्ते बनवले जात असत. बापूंनी सामान्य नागरिकांना रस्त्यांची गुणवत्ता व दर्जा कसा तपासावा याबाबत प्रबोधन केले. यातून अनेक भागातील रस्ते जे वर्षानुवर्षे खड्डेमय दिसत होते. प्रशासकीय यंत्रणा आता ठेकेदार अलर्ट झाल्याने हे रस्ते पहिल्यांदा सुधारलेले आहेत.
आपल्या भागातील विकासकामांबाबत नागरिक जागरूक करण्यामध्ये बापूंचा सिंहाचा वाटा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, बापू यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोलीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक संस्था सध्या पुढाकार घेत आहेत. वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशस्त रस्त्यांसाठी प्रयत्न केले जात आहेत.
शुद्ध पेयजलसाठी पाठपुरावा
शिरूर – हवेली या दोन तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी लोकसंख्येनुसार शासनाकडे पाठपुरावा करून शुद्ध पेयजल योजना कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवण्यात पवार यशस्वी झाले आहेत. बारा वर्षांपूर्वी शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे व आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोलीच्या तत्कालीन सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील व तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी वढू येथून वाघोली गावासाठी पाण्याची योजना राबवली आहे.
ही पाणी योजना खऱ्या अर्थाने वरदान ठरली आहे. आतापर्यंत कोणीही लोकसंख्येच्या प्रमाणानुसार योजना राबवली नाही. सध्या बापूंच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून पाण्याची योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाघोलीतील बसडेपो सुरू करण्यासाठी तत्कालीन आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून वाघोली येथे बीआरटीचा बसथांबा सुरू झाला असून तो त्याचाच एक भाग आहे.
विजेचा प्रश्न मिटला
कृषी क्षेत्रात विजेअभावी पिकांचे होणारे नुकसान होत होते. विजेच्या लपंडावामुळे शेतकरी होरपळून जात होता. ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील ट्रान्सफार्मर वेळेवर मिळत नव्हते. आमदार पवार यांनी महावितरणकडे पाठपुरावा करून आठ दिवसांत गावोगावी ट्रान्सफार्मर बसवण्याची व्यवस्था करून महावितरणवर अंकुश ठेवला. त्यामुळे विजेच्या लपंडावमध्ये अडकलेला शेतकरी सहजरित्या शेती करू लागला आहे. हे बापूंनी केलेल्या कामाची पोचपावती आहे.
बायोमेट्रिकचा रोल मॉडेल
राज्यात बायोमेट्रिक प्रणालीद्वारे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली जाते. याच प्रणालीच्या धर्तीवर अन्नधान्य वितरण व्यवस्था राबवली जावी, यासाठी बापू यांनी राज्यातील पहिला बायोमेट्रिक प्रणाली राबविण्याचा निर्णय शिरूर-हवेली मतदारसंघांमध्ये घेतला. या प्रणालीद्वारे मृत व्यक्तींची नावे अथवा बोगस अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार उघडकीस आला आहे. गोरगरिबांना हक्काचे चार घास मिळायला लागले.
– राजेंद्र अमृतराव सातव पाटील,
माजी उपसरपंच, अध्यक्ष – वाघेश्वर देवस्थान ट्रस्ट, वाघोली.