कोल्हापूर – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झालेला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत होती. मात्र या निवडणुकीत विजयी होण्याचे भाजपचे स्वप्न अपूर्णच राहिले. यावर काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी ट्विटवर व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली.
‘कोल्हापूर उत्तरमधून जयश्रीताईंचा विजय हा संपूर्ण महाविकास आघाडीचा विजय आहे. कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचे आभार. महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! कोल्हापूर शाहू महाराज आणि ताराराणींच्या विचाराचे आहे हे मतदारांनी दाखवून दिले.’
काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांचे ट्विट
कोल्हापूर उत्तरमधून जयश्रीताईंचा विजय हा संपूर्ण महाविकास आघाडीचा विजय आहे.
कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचे आभार.
महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
कोल्हापूर शाहू महाराज आणि ताराराणींच्या विचाराचे आहे हे मतदारांनी दाखवून दिले. @INCMaharashtra pic.twitter.com/6JbGgmkErI
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 16, 2022