बावधन – “अरे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, “जय शिवाजी, जय भवानी’, असा जयघोष करत बावधन बुद्रुक आणि खुर्द गावातील ग्रामस्थांनी गुरूवारी (दि. 2) एकदिवशीय साखळी उपोषण केले.
मराठ्यांचा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बावधनकरांनी श्री गुरूदत्त मित्र मंडळ, बकाजी कॉर्नर याठिकाणी सकाळपासून साखळी उपोषणाला सुरवात केली. यावेळी मराठा आरक्षण महत्वाचे का? याबाबत ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सायंकाळी शांतता मशाल यात्रा काढण्यात आली.
त्यामध्ये सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पाटील नगर, एनडीए रोड, शिव स्मारक, बावधन खुर्द गावठाण, चावडी, बापुजीबुवा मंदिर या मार्गे उपोषणस्थळी यात्रेचा समारोप झाला. यावेळी गावात राजकीय पक्ष व नेत्यांना प्रवेश बंदी करत असल्याचे बावधनकरांनी सांगितले.
मराठा आरक्षणासाठी ‘शांतता मशाल यात्रा’; बावधनकारांचे एकदिवशीय साखळी उपोषण pic.twitter.com/WBrG6Pgrma
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 2, 2023