World Cup 2023 India vs Sri Lanka Match live Score : विश्वचषक 2023 च्या 33व्या सामन्यात आज भारताचा सामना श्रीलंकेशी होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सहापैकी सहा सामने जिंकून टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे, तर श्रीलंकेने सहापैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. त्यांना चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजच्या विजयासह भारत उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित करेल. त्याच वेळी, श्रीलंकेसाठी हा ‘करो वा मरो’चा सामना आहे. पराभवामुळे उपांत्य फेरीचा त्याचा मार्ग अत्यंत कठीण होईल. श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांची शानदार अर्धशतके आणि रविंद्र जडेजानं शेवटच्या षटकामध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर 50 षटकात 8 गडी गमावून 357 धावा केल्या असून श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचं मोठ आव्हान ठेवलं आहे.
358 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली आहे. 11.3 षटकात अवघ्या 22 धावसंख्येवर श्रीलंकेचे 7 फलंदाज माघारी परतले आहेत. यामध्ये पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा आणि दुशान हेमंता हे फलंदाज शून्यावर तर कुसल मेंडिस हा फक्त 1 धाव काढून माघारी परतला आहे.
#CWC23 #INDvSL : शुभमन-विराट-श्रेयसची शतके हुकली; भारतानं श्रीलंकेविरूध्द उभारली मोठी धावसंख्या…
श्रीलंकेचे 7 फलंदाज तंबूत
11.3 षटकात 22 धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेची सातवी विकेट पडली. दुष्मंथा चमीरा खाते न उघडताच बाद झाला. त्याने सहा चेंडूंचा सामना केला आणि लेगस्टंपच्या बाहेरील चेंडूवर राहुलने त्याचा झेल घेतला. हा चेंडू खूपच खराब होता, पण सुदैवाने यातही शमीला एक विकेट मिळाली. श्रीलंकेचे 5 फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत. त्याआधी म्हणजेच 9.4 षटकात अवघ्या 14 धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेची सहावी विकेट पडली. मोहम्मद शमीने दुशान हेमंताला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. हेमंतालाही खाते उघडता आले नाही. पॉवरप्लेनंतर श्रीलंकेच्या संघाची धावसंख्या 6 बाद 14 धावा अशी अवस्था होती.
श्रीलंकेचा निम्मा संघ 14 धावांवर माघारी…
358 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. पथुम निसांका पहिल्याच चेंडूवर बाद झाला. बुमराहने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. त्यानंतर लगेचच श्रीलंकेने दोन धावांवर दुसरी विकेट गमावली. मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर दिमुथ करुणारत्नेला विकेट्ससमोर पायचीत केले. श्रीलंकेचे दोन्ही सलामीचे फलंदाज पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाले. यानंतर श्रीलंकेच्या संघाने दोन धावांच्या स्कोअरवर तीसरीही विकेट गमावली. चांगल्या फॉर्मात असलेली सदिरा समरविक्रमाही खाते न उघडताच बाद झाली. त्याने चार चेंडूंचा सामना केला आणि सिराजने त्याला स्लीपमध्ये श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले.
त्यानंतर श्रीलंकेला 3.1 षटकात तीन धावांवर मोठा व चौथा धक्का बसला. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला कर्णधार कुसल मेंडिसही 10 चेंडूत एक धाव करत बाद झाला. सिराजने त्याला क्लीन बोल्ड केले. या सामन्यातील सिराजचे हे तिसरे यश आहे. श्रीलंकेचा निम्मा संघ 14 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला . चरिथ असलंका 24 चेंडूत एक धावा काढून बाद झाला. शमीने त्याला रवींद्र जडेजाकरवी झेलबाद केले. आशिया कप फायनलप्रमाणेच पुन्हा एकदा भारत श्रीलंकेविरुद्ध एकतर्फी विजयासाठी सज्ज झाला आहे.