भांडगावात खो-खो स्पर्धेचे उद्घाटन
इंदापूर – मातीतील खेळाची आपली संस्कृती शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी 32 शाळा एकाच इंदापूर तालुक्यासाठी दिल्या होत्या. समताही शिक्षणातून येत असते. चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले की उन्नती होते.
पवार यांच्यावर प्रेम करणारे जे कार्यकर्ते होते त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले, संस्था नुसत्या काढल्या नाहीत तर त्यांनी संस्था चांगल्या चालवल्या आहेत यापैकी अशोकराव घोगरे यांनी शैक्षणिक संस्था चांगली चालवली आहे, असे गौरोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.
भांडगाव (ता. इंदापूर) येथील माध्यमिक विद्यालय येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका अंतर्गत आयोजित शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव घोगरे,
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण माने, युवक नेते डॉ. शशिकांत तरंगे, इंदापूर क्रीडा अधिकारी महेश चावले, उमेश घोगरे, विजय घोगरे, अभिजीत घोगरे, सागर मिसाळ, छाया पडसळकर, डॉ. लक्ष्मणराव आसबे, कालिदास देवकर, छगनराव तांबिले, संजय देवकर, विकास खिलारे, संस्थेचे प्राचार्य सुभाष गायकवाड पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.