Pawar family : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर राज्यातील राजकीय गणित पूर्णपणे बिघडले आहे. या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. त्यानंतर बंडानंतर यंदाची पहिली दिवाळी साजरी झाली आहे. ज्यामध्ये सगळे पवार कुटुंब एकत्र दिसून येत आहेत.
दरम्यान, दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गोविंदबागेत अजित पवार (ajit pawar) गैरहजर राहिल्यानंतर काल काटेवाडीत भाऊबीज साजरी करण्यासाठी सर्व पवार कुटुंबीय एकत्र जमले होते. सुप्रिया सुळे (supriya sule) आज काटेवाडीत अजित पवार यांच्या निवासस्थनी दाखल झाल्या होत्या. याठिकाणी त्यांनी आपला भाऊ अजित पवारांसोबत भाऊबीज साजरी केली आहे.
राजकीय मतभेद एका बाजुला आणि कौटुंबिक सलोखा आणि नाती एका बाजुला असे यापूर्वीही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले होते. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
दरम्यान, एकत्रित दिवाळी साजरी केल्यानंतर आता शरद पवार (shard pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. दिवाळीच्या निमित्ताने दोन्ही काका-पुतणे एकत्र आले होते.
याबाबत शरद पवारांनी भूमिका मांडली. “एकत्र दिवाळी करणे ही आमची अनेक वर्षाची परंपरा आहे. या भेटीत कोणताही राजकीय लवलेश नव्हता, मात्र मीडियाला बातमी लागते”, असं शरद पवार म्हणाले.