Air India Pilot Dies: एअर इंडियाच्या एका वैमानिकाचे विमान कंपनीच्या गुरुग्राम कार्यालयात हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. एअर इंडियाच्या या पायलटचे वय अवघे 37 वर्ष होते. पायलटच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृदयविकाराचा झटका येताच त्याला सीपीआर देण्यात आला. त्यानंतर तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण जीव वाचू शकला नाही.
एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, 16 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.35 वाजता, 37 वर्षीय एअर इंडिया कमांडरला एअर इंडियाच्या कार्यालयातील स्तर 3 वर अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्याला सहकाऱ्यांनी सीपीआर दिला आणि ताबडतोब मेदांता मेडिकल सेंटरमध्ये नेले. डॉक्टरांकडून सीपीआर आणि प्राथमिक उपचार करूनही तो बेशुद्धच राहिला आणि नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.