Daniel Balaji Death| तमिळ फिल्म अभिनेता डॅनियल बालाजीचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमी वयातच अभिनेत्याचे निधन झाल्यामुळे भारतीय सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
काल रात्री त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना लगेच चेन्नई येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते या धक्क्यातून सावरतील अशीच सर्वांना खात्री होती. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांवर आणि सेलिब्रिटी मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डॅनियल यांच्या पार्थिवावर आज (३० मार्च) चेन्नईतील पुरसाईवलकममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
‘हनुमान’ फेम दिग्दर्शक मोहन राजा यांनी डॅनियल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते लिहिताता, ‘वाईट बातमी. मी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. खूप चांगला मित्र. त्याच्यासोबत काम करता आलं नाही याचं कायम दु:ख राहील. ओम शांती.’ सध्या त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांकडूनही दु:ख व्यक्त केले जात आहे.
💔💔💔💔💔💔💔
Such a Sad news
He Was an inspiration for me to join film institute
A very good friend
Miss working with him
May his soul rest in peace #RipDanielbalaji https://t.co/TV348BiUNJ— Mohan Raja (@jayam_mohanraja) March 29, 2024
डॅनियल बालाजीची सिने कारकीर्द
डॅनियल बालाजी यांनी कमल हसन यांच्या ‘मरुधनयगम’ सिनेमात करिअरला सुरुवात केली होती. मात्र हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. नंतर त्यांनी टीव्ही माध्यमात काम केलं. ‘चिट्ठी’ मालिकेमुळे ते लोकप्रिय झाले. यानंतर ते पुन्हा सिनेमांकडे वळले.
त्यांना एकापेक्षा एक सुपरहिट तमिळ आणि मल्याळम सिनेमे केले. काखा काखा, पोल्लाधवन, वेट्टय्याडू विलायाडू आणि वडा चेन्नई अशा काही सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. यासोबतच कमल हसन, थलपति विजय आणि सूर्या सारख्या सुपरस्टार्ससोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे.
हेही वाचा:
‘मोदी सरकारने तरुणांना नोकरी तर शेतकऱ्यांना हमी दिली का? ते जनतेला कर्जात बुडवत आहे का ?’