पुणे: कॅटालोनिआ फुटसाल महासंघाच्या वतीने होणाऱ्या 13 वर्षाखालील मुलांच्या फुटसाल विश्वचषक स्पर्धेसाठी पुण्याच्या नरेंद्र पाटील आणि युवराज चव्हाण यांची निवड झाली आहे.
नरेंद्र पाटील यांची पथक प्रमुखपदी निवड झाली असून युवराज चव्हाण यांची संघ व्यवस्थापक पदी निवड झाली आहे. फुटसाल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा संघ स्पर्धेत सहभागी होत आहे.
फुटसाल असोसिएशन इंडियाच्या वतीने ही निवड करण्यात आली आहे. स्पेनमध्ये 27 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2019 दरम्यान ही विश्वचषक स्पर्धा होणार आहे. जगभरातून 16 देश विश्वचषक स्पर्धेसाठी सहभागी झाले आहेत. भारताच्या गटात अर्जेंटिना, ब्राझील, इटली आदी देश आहेत.
हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतून संघाची निवड करण्यात आली आहे. तेरा वर्षाखालील गटात प्रथमच भारताचा संघ सहभागी होत आहे.