मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा चाहता वर्ग काही दिवसांपासून त्यांच्या बहुप्रतीक्षित ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहात होते. दरम्यान, आता या चित्रपटचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये रणबीर आणि आलिया यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील या ट्रेलरमध्ये दिसत आहेत.
आलियानं या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,’आमच्या ह्रदयाचा भाग- ब्रम्हास्त्र. 09.09.2022 रोजी लवकरच भेटूयात. ‘
ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, या चित्रपटाचे कथानक हे शिवा या भूमिकेवर आधारित असणार आहे. शिवा ही भूमिका रणबीरनं साकारली आहे. शिवा आणि ईशा यांची लव्हस्टोरी देखील या चित्रपटामध्ये दाखण्यात येणार आहे. ईशा ही भूमिका आलिया साकारत आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या पहिल्या पार्टचा हा ट्रेलर आहे. या चित्रपटाचे तीन पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अयान मुखर्जीनं या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
View this post on Instagram
ब्रम्हास्त्र चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन हे प्रोफेसर ‘अरविंद चतुर्वेदी’ आहेत आणि नागार्जुन पुरातत्वशास्त्रज्ञच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचे नाव ‘अजय वशिष्ठ’ आहे. मौनीच्या पात्राचे नाव ‘दमयंती’ आहे.