Parliament Security Breach: बुधवारी (१३ डिसेंबर) संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आणि भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या स्वाक्षरी असलेल्या व्हिजिटर पासवर दोन व्यक्ती लोकसभेत दाखल झाले. यानंतर सागर वर्मा आणि मनोरंज डी नावाच्या दोघांनी संसद भवनातील व्हिजिटर गॅलरीतून उडी मारून धुमाकूळ घातला. या हल्ल्यामागे फरार आरोपी ललित झा मुख्य सुत्रधार असल्याचे बोलले जात आहे.
आतापर्यंतच्या तपासात ललित झा हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. यामागे मोठे षडयंत्र असल्याचे बोलले जात आहे, जे ललित झा पकडल्यानंतर समोर येईल. सध्या पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असून त्यात सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम देवी आणि विशाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ललित झा यांच्या सांगण्यावरूनच 13 डिसेंबरची तारीख निश्चित केल्याचे चौकशीत उघड झाले.
ललित झा याने गुरुग्रामला भेटीसाठी बोलावले –
ललित झा याने सर्वांना गुरुग्राममध्ये बैठकीसाठी बोलावले होते. त्यानंतर हे लोक संसद भवनाबाहेर पोहोचले. या चार जणांना संसदेत प्रवेश करायचा होता, पण केवळ दोन जणांनाच पास मिळू शकल्याने दोन जणांना बाहेर ठेवण्यात आले. ललित झा यानेच या स्मोक कॅंडल हल्ल्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचा ललित हा एकमेव सूत्रधार होता, ज्यांच्याशी सर्व आरोपी संपर्कात होते.
चारही आरोपींचे फोन घेऊन ललीत फरार –
घटना घडण्यापूर्वी ललितनेच चार आरोपींचे फोन ताब्यात घेतले आणि तेथून पळ काढला. पोलिसांना संशय आहे की मोबाईलमध्ये कटाशी संबंधित अनेक पुरावे असू शकतात, जे ललित झा पुसण्याचा प्रयत्न करू शकतो. ललित झाचे शेवटचे लोकेशन नीमरानाजवळ आले आहे, त्याच्या शोधात अनेक पथके सतत छापे टाकत आहेत. ललित झा याच्याशी संबंधित पश्चिम बंगालच्या एनजीओचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. ललित झा या एनजीओचा सरचिटणीस असल्याने या एनजीओच्या निधीचीही चौकशी केली जाणार आहे. आरोपींविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.