Aadhaar Card : जर तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card) दहा वर्षे जुने असेल किंवा तुम्ही गेल्या दहा वर्षांत एकदाही आधार (Aadhaar Card) अपडेट केले नसेल, तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. १४ डिसेंबर ही मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची संधी होती; पण सरकारने ती तीन महिन्यांनी वाढवली आहे.
युआयडीएआयने आपल्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत आधार अपडेट्समध्ये मोठी वाढ झाली आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही मोफत आधार अपडेटची तारीख देखील वाढवली आहे. आता आधार पुढील तीन महिन्यांसाठी म्हणजेच १४ मार्च २०२४ पर्यंत मोफत अपडेट करता येईल.
आधार अपडेटसाठी तुम्हाला दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. पहिले ओळखपत्र आणि दुसरा पत्त्याचा पुरावा. आधार अपडेटसाठी आधार केंद्रावर सहसा ५० रुपये शुल्क आकारले जाते, परंतु युआयडीएआयनुसार, ही सेवा आता २४ मार्चपर्यंत मोफत आहे. ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही मतदार कार्ड देऊ शकता.
कसे कराल आधार अपडेट?
मोबाइल किंवा लॅपटॉपवरून युआयडीएआयच्या वेबसाइटवर जा. यानंतर अपडेट आधारच्या पर्यायावर क्लिक करा. आता आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉग इन करा. आता सबमिट वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला एक विनंती क्रमांक मिळेल आणि फॉर्म सबमिट केला जाईल. तुम्ही विनंती क्रमांकावरून अपडेटची स्थिती देखील तपासण्यास सक्षम असाल. काही दिवसांनी तुमचा आधार अपडेट होईल.