Bollywood : अभिनेत्री परिणीती चोप्राने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर परिणीतीच्या नावाने अनेक फॅन क्लब आहेत. काही लोक परिणीतीच्या नावाचा वापर करुन तिच्या मुलाखतीतील चुकीचे कोट्स शेअर करत आहेत, ज्यामुळे ती चांगलीच संतापली आहे. सध्या तिने केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
परिणीती चोप्राने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे फॅन क्लबला चांगलेच खडेबोल सुनावले. परिणीतीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. परिणीतीने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मला असे दिसतेय की फॅन क्लब त्यांच्या कलाकारांच्या बाजूने कोट देण्यासाठी माझे नाव वापरत आहेत. हे बनावट आहे. मी कोणाचीही मुलाखत किंवा कोट दिलेले नाही. किंवा मी त्यांचे अभिनंदनही केलेले नाही. ना मी त्यांचे कौतुक केले आणि हो, प्रथम तुम्ही खरेखोटे तपासा.”
परंतु अचानक परिणीतीने अशी पोस्ट का केली? नेमकं काय घडलं? हे तिने अद्याप स्पष्ट केलेले नाही. परिणीती चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, परिणीती चोप्रा शेवटची अक्षय कुमारसोबत ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटात दिसली होती. मात्र या चित्रपटाला फारसे यश मिळू शकले नाही. लवकरच परिणीती इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’ या म्युझिकल ड्रामामध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीचे परिणीतीने आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत विवाह झाला. मोठ्या थाटात त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नामध्ये अनेक राजकीय आणि बॉलीवूड कलाकरांनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.