Parineeti Chopra । अलीकडेच दीपिका पदुकोणने नुकतीच प्रेग्नन्सी घोषणा केली. अशात आता तिच्या नंतर अभिनेत्री परिणीती चोप्राच्या प्रेग्नेंसीचीही चर्चा सुरु आहे. अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होत आहे.
परिणीती चोप्राचा पुढचा चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’ आहे. यामध्ये ती दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. दरम्यान, अभिनेत्रीला नुकतेच विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी, परिणीती सैल पांढरा शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसली.
View this post on Instagram
परिणीती तिचा लूक पाहण्यासारखा होता. अशात हा व्हिडिओ समोर येताच तिच्या प्रेग्नन्सीची चर्चा सुरू झाली. तिने आपला बेबी बंप सैल-फिटिंग शर्टमध्ये लपवण्याचा प्रयत्न केला आणि ती गर्भवती असल्याचे बोलले जात आहे. मात्र, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्याकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परिणीती चोप्राच्या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहे. एकाने लिहिले की, ‘ती प्रेग्नंट आहे का?’ तर काहींनी तिला शुभेच्छा दिल्या आहे.
परिणीती चोप्राने गेल्या वर्षी आप नेते राघव चढ्ढासोबत लग्न केले. याआधी 13 मे रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये दोघांची एंगेजमेंट झाली होती. यानंतर 24 सप्टेंबर 2023 रोजी उदयपूरमधील एका आलिशान हॉटेलमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.
हेही वाचा
Katrina Kaif | फराह खानने केला खुलासा ‘तीस मार खान’साठी कतरिना कैफला कास्ट करायचे नव्हते, तर..’