नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान बुधवारी परिणीती आणि राघव क्रिकेट सामना पाहण्यासाठी मोहालीत पोहोचले. यावेळी दोघांनीही क्रिकेट मॅचचा आनंद घेतला. दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
परिणीती चोप्राला स्टेडियममध्ये पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले. यावेळेसचा एक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये प्रेक्षक दोघांनाही पाहून मोठं मोठ्याने ओरडताना दिसत आहेत. यापूर्वी देखील दोघे डिनर डेटवर स्पॉट झाले होते. तेव्हापासूनच दोघे विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
राघव चड्डा राजकारणी असून आम आदमी पक्षाचे नेते आहेत. दोघांनीही मुंबई विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यासाठी हजेरी लावली. यावेळेसचे दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. मॅचदरम्यान दोघेही ज्यावेळी स्क्रिनवर दिसले त्यावेळी प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. परिणीती भाभी झिंदाबाद अशा घोषणा देखील यावेळी अनेक चाहत्यांनी दिल्या.
It’s in public now♥️
MP Raghav Chadha & Actress Parineeti Chopra spotted watching IPL 2023 game in Mohali….@raghav_chadha @ParineetiChopra pic.twitter.com/g02knMx4Su— Meena Joshi (@MeenaJoshi_) May 3, 2023
प्रेक्षकांची घोषणाबाजी ऐकून परिणीती देखील आणि राघव दोघे देखील हसू लागले. दोघांनी अधिकृतपणे आपल्या नात्याबाबत खुलासा केलेला नाही. मात्र लवकरच दोघे साखरपुडा करणार असल्याचं बोललं जात आहे.