पारगाव, (वार्ताहर)- सकल मराठा समाजाला शासनाने तातडीने आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण चालू केले आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पारगाव येथील मराठा समाज बांधवांनी कडकडीत बंद पाळला आहे.
(दि.१०) फेब्रुवारी पासून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने सगे सोयरे हा कायदा करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. त्यासाठी उपोषण चालू केले असून पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र बंद या हाकेला साद देत (दि.१४) दौंड तालुक्यातील पारगाव या ठिकाणी अत्यावश्यक सेवा मेडिकल व दूध व्यवसाय वगळून इतर कडकडीत बंद पाळण्यात आला.