जेजुरी -करोना विषाणूचे महाभयंकर संकट लवकर दूर व्हावे यासाठी महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाला साकडे घालण्यात आले आहे. या निमित्ताने खंडोबा मंदिरात मार्तंड विजय ग्रंथाचे पारायण व देवाला जलाभिषेक सुरु करण्यात आला आहे.
पुजारी सेवक वर्गाचे चेतन सातभाई हे रविवारपर्यंत श्री मार्तंड विजय ग्रंथाचे पारायण तर वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी हे जलाभिषेक व रुद्राभिषेकाचे पौरोहित्य करीत आहेत.
रविवारपर्यंत दुग्ध, भंडारा, शर्करा, बेलपत्र आदींचा अभिषेक खंडोबा देवाला घालण्यात येणार असल्याचे श्री खंडोबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे यांनी सांगितले.