परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना; दोघांमध्ये फक्त काही सेकंदाचा संवाद

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले आहेत. दरम्यान, चांदीवाल आयोगासमोर जाताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे आज एकमेकांसमोर आले. त्यावेळी दोघांमध्ये काही सेकंदांसाठी संवाद झाला. पण यावेळी दोघांमध्ये काय बोलणे झाले हे काही समजू शकले नाही. तरी, चांदीवाल आयोगासमोर गैरहजर राहिल्याने याआधी दोनदा बजावलेले जामीनपात्र वॉरंट आता रद्द करण्यात आले आहे.

चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. यावेळी चांदीवाल आयोगाने परमबीर सिंहांना बजावलेले  जामीनपात्र वॉरंट रद्द केले आहे. परंतु, आयोगासमोर हजर राहण्यापूर्वी परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये काही सेकंदांसाठी संवादही झाला. पण त्यांच्यात नेमकं काय बोलणं झाले ते कळू शकले नाही.

काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकं आढळली होती. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झालेच, पण या प्रकरणाने वेगळे वळणंही घेतले. याचप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझेंच्या अटकेनंतर पहिल्यांदाज परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले. त्यामुळे काही सेकंदांच्या भेटीत या दोघांमध्ये काय बोलणं झालं? याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.