पंकजा मुंडे भाजपातच राहणार – महादेव जानकर

औरंगाबाद – भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपातच आहेत. त्या भाजपात राहणार असून त्या भाजपातचं मरणार हे विसरता कामा नये, असे वक्तव्य माजी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.

औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधतेवेळी ते बोलत होते. महादेव जानकर यांना पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, एक लक्षात ठेवा, पंकजा मुंडे या भाजपातच आहेत. त्या भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार हे विसरता कामा नये. आता काही लोकांना असे वाटत असेल तर ठिक आहे. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेचा पराभव झाल्यानंतर ताई काही लोकांशी बोलल्या नाहीत. त्यांना अनेक मॅसेज आले. त्यामुळे त्या म्हणाल्या, मी तिथे बोलेन, असेही त्यांनी म्हणाले.

पण काहीही होणार नाही. ताईंनी फेसबुक पोस्टमध्ये मावळे म्हटले आहे. पण आता मावळे काय आपण प्रत्येकाला लिहितो. त्या भाजपच राहणार असून त्या कधीही पक्षाच्या बाहेर पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान पंकजा मुंडे येत्या 12 तारखेला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 12 डिसेंबर हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जन्मदिवस. त्यामुळेच जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर संवाद साधण्यासाठी पंकजांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.