पालघर | नागरिकांनी घराबाहेर पडू नये, पुढील तीन तास महत्त्वाचे…

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आवाहन

पालघर : वाऱ्याचा वेग व पाऊस वाढणार असून दुपारी भरती येणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. पुढील तीन तास महत्त्वाचे असल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.

तसेच कच्च्या घरात असल्यास नजीकच्या जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केलेल्या शाळेत आश्रय घ्यावा तसेच विजेच्या खांबापासून व झाडांपासून नागरिकांनी दूर रहावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.