पुणे – म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 4 हजार 777 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी नागरिकांना दि. 8 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.
म्हाडाच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यास गुरुवारी (दि.7) सुरुवात झाली. यंदा सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर 2 हजार 416 सदनिका, म्हाडाच्या विविध योजनेतील 18 सदनिका, म्हाडा पीएमएवाय योजनेत 59 सदनिका, पीएमएवाय खासगी भागीदारी योजनेत 978 सदनिका, 20 टक्के योजनेतील पुणे मनपा मध्ये 745 सदनिका आणि 20 टक्के योजनेतील पिंपरी चिंचवडमध्ये 561 सदनिका आहेत.
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरीता अर्जदारांनी प्रथम www.mhada.gov.in अथवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
सोडतीचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची मुदत – दि.8 एप्रिल
ऑनलाइन पेमेंट, अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुदत – दि.12 एप्रिल
सोडतीसाठी अर्जाची प्रारुप यादी प्रसिद्ध – दि.24 एप्रिल
सोडतीसाठी अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध – दि.30 एप्रिल
सोडत – दि.8 मे.