पळसदेव -“द ग्रेट खली’ यांच्या लूकमधील पळसदेवच्या काळेवाडीतील फकीर भंडारी यांनी शनिवारी (दि. 16) जितू चौधरी विरुद्ध झालेल्या लढतीत विजय मिळवून लुशचा बेल्ट मानकरी झाला. भंडारी हा मूळचा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुरलेगावच रहिवासी. त्याची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याची आई वडील पळसदेव काळेवाडी नं. 2 येथे मासेमारी व्यवसाय करून मुलाला शिकवत आहेत.
2020 मध्ये फकीर भंडारी हा पंजाबमधील जालिंदर जिल्ह्यातील कंगनीऑल येथिल द ग्रेट खली यांच्या अकॅडमीमध्ये 2 वर्षांपासून सराव करीत आहे. त्याने दिनांक 16 रोजी सी डब्ल्यू या रेसमध्ये भाग घेऊन जितू चौधरी याच्याशी फाइट झाली. फाइट चालू असताना चौधरीने भंडारे यांच्या डोक्यात खुर्ची मारल्यानंतर भंडारी हे रक्तबंबाळ झाले होते; मात्र अशा परिस्थितीत फकिरने स्वतःला सावरून त्याने तीच
खुर्ची चौधरी यांच्या डोक्यात मारल्यानंतर रेफ्रिने (अंपायर) तीन वेळ कोटिंग केली तरी तो न उठल्याने फकीर भंडारीला विजयी घोषित केले. “लुश’चा साधारण 30 ते 35 लाख रुपये किंमत असलेला बेल्ट त्याला विजय झाल्यानंतर देण्यात आला. यावेळी पंच म्हणून राज कुंज्रा यांनी काम पाहिले तर द ग्रेट खली यांनी त्याचे अभिनंदन केले.