पिंपरी, (प्रतिनिधी) – इस्कॉन श्री गोविंद धाम मंदिरामध्ये मंदिराच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त पलाखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. हरेकृष्ण नामाचा गजर करत भाविक त्यात सहभागी झाले होते.
मंदिरात कालपासून विविध कार्यक्रम सुरू आहेत. मंगळवारी (दि. २७) सायंकाळी साडेसहा वाजता श्री राधा विजय गोविंद यांचा पालखी उत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये भगवंतांना अतिशय सुंदर सजावट करून पालखीमध्ये बसून पालखीची शोभायात्रा काढण्यात आली.त्यात हजारो भक्तांनी भाग घेतलेला होता.
पालखी सोहळ्यामध्ये अनेक भक्त हरेकृष्ण नामाचा गजर करीत या पालखी सोहळ्यामध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. आज सकाळी साडेचार वाजल्यापासून आजच्या उत्सवाच्या विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहाटे साडेचार वाजता भगवंतांच्या आरतीने आजच्या दिवसाला सुरुवात झाली. त्यानंतर भगवंतांचा सुंदर शृंगार करण्यता आला. तो दिवसभर सर्व भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होता.
सायंकाळी श्री राधाकृष्ण यांचा पंचामृताने अभिषेक करण्यात आला. त्यासोबत विविध फळांचा रस आणि विशेष रंगाने अभिषेक करण्यात आला. त्यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. अभिषेकानंतर भगवंत भगवंतांना नैवेद अर्पण करण्यात आला. त्या समवेत महाआरती झाली. आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण झाले. त्यानतंर इस्कॉनचे संस्थापक आचार्य स्वामी श्रील प्रभुपाद यांचे वरिष्ठ शिष्य परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या प्रवचन झाले.