#BharatAtAG22 : आशियाई क्रीङा स्पर्धा 2023((Asian Games 2023) मध्ये सहाव्या दिवशी नेमबाजीमध्ये भारताला आणखी दोन पदके मिळाली आहेत.भारताला 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीच्या वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदकासह रौप्यपदकही मिळालं आहे.
सतरा वर्षींय पलक हिने सुवर्णपदक पटकावलं आहे तर 18 वर्षीय ईशा सिंगने रौप्य पदक जिंकलं आहे.याच प्रकारात पाकिस्तानच्या किश्माला तलत हिने कांस्य पदक पटकावलं आहे.
भारताच्या पलकने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत 242.1 गुणांसह अव्वल तर ईशा सिंगने 239.7 गुणांसह दुसरे स्थान पटकावलं. पाकिस्तानच्या किश्माला तलत हिने 218.2 गुणांसह तिसरे स्थान मिळवले.