करोना लसीसाठी पाकिस्तानची भारताकडे नजर?

इस्लामाबाद – भारतात तयार झालेली कोविशिल्ड पाकिस्तानला हवी असल्याची बातमी असून त्यांनी तशी मागणी केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानला लस देण्याबाबत भारताने अजुन काही चर्चा केली नसली तरी पाकिस्तानने त्यांच्या देशात कोविशिल्डला मंजुरी दिली आहे. भारत शेजारधर्म पाळणार आहे.

शेजारी राष्ट्रांना लस देण्याचे सुतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काही देशांना तशी मदत रवानाही करण्यात आली आहे. मात्र पाकबाबत भारतात अद्याप अधिकृपणे कोणती माहिती देण्यात आलेली नाही.

जीवनावश्‍यक बाब म्हणून पाकिस्तानकडून भारतीय उत्पादनांची मागणी होतेय. करोनावरील लस त्यांना हवी आहे. दरम्यान भारताने असा काही सकारात्मक निर्णय घेतला तर करोना लस ही भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याचं औषध ठरू शकते असा दावा काहींनी केला आहे. करोना मुळे भारत पाकिस्तान संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरू झाली तर चांगली गोष्ट आहे.

मोदी सरकारला विनंती आहे की ही संधी आहे तुम्ही स्वतःहून पाकिस्तान ला कोरोना लस देण्याची ऑफर द्यावी.पाकिस्तान याचा स्वीकार करेल की नाही हा वेगळा विषय आहे.पण यामुळे पाकिस्तानी जनतेत भारता बद्दल आपुलकी निर्माण होईल असा त्यांचा युक्तीवाद आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सगळ्या देशांना लस मिळावी म्हणून कोवॅक्‍स योजना तयार केली आहे. त्यामधून पाकिस्तानला कोविशिल्ड लस मिळण्याची शक्‍यता आहे. पाकिस्तान दहशतवाद पोसतो, तिकडे काश्‍मीरमध्ये घुसखोरी करुन जवानांना ठार मारतो. असल्या पाकिस्तानला भारत लस देईल का, हा प्रश्‍नही आहे.

पाकिस्तान आपला मित्र देश चीनकडून येणाऱ्या लसीच्या प्रतिक्षेत असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी होते. मात्र लस देउन व त्यासाठी कर्ज काढायला लावून गरजू देशांना आपल्या सापळ्यात अडकवण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचा दावाही काही माध्यमांनी केला आहे. त्यात अर्थातच पाकिस्तानच्या नावाचाही समावेश आहे.

पाकिस्तान अगोदरच चीनच्या विळख्यात अडकले आहे. इतके की पाकला चीनची वसाहत म्हणण्यापर्यंत त्याच देशाच्या विरोधी पक्षांची मजल गेली आहे. अशा स्थितीत चीनची मदत घेणार का आणि अधिक दलदलीत अडकायचे का, असा विचार त्या देशाच्या नेतृत्वाला करावा लागणार आहे. जर चीनची लस नाही तर मग काय असा विचार करता पाकला भारताचीच लस परवडणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.