“माझी संस्था- माझी बस-माझी जबाबदारी’

पीएमपीएमएलतर्फे 32 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अभिनव उपक्रम

 

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) 32 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ सर्व आगारांमध्ये “माझी संस्था – माझी बस – माझी जबाबदारी’ हा अभिनव उपक्रम राबवून करण्यात आला. परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप व सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची अंमलबजावणी आगारस्तरावर करण्यात आली.

पीएमपीएमएलच्या सर्व आगारांमध्ये आगार व्यवस्थापक व आगार अभियंता यांनी चालक, वाहक, कार्यशाळा व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या गेट मिटिंग घेऊन, त्यांना “माझी संस्था – माझी बस – माझी जबाबदारी’ याचे महत्त्व पटवून देऊन गांभीर्याने काम करण्यास सांगितले. तसेच “विना अपघात, विना ब्रेकडाऊन, प्रवासीभिमुख सेवा’ देण्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. सर्व चालकांना रोड सेफ्टी बॅज व “नमस्कार पीएमपीएमएलमध्ये आपले स्वागत आहे’ असा मजकूर असलेले बॅच देण्यात आले.

वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पीएमपीएमएलच्या आगारांना भेटी देऊन कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाबाबत प्रबोधन केले. पिंपरी आगारात वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी तर भेकराईनगर आगारात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजप्पा यांनी मार्गदर्शन केले. तसेच, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीएमएलच्या बसने जास्तीत जास्त नागरिकांनी प्रवास करावा, असे आवाहन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.