लंडन : काश्मीर मधून कलाम ३७० हटवल्यापासून भारत पाक मध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. अशा परिस्थितीतच एका पाकिस्थानी नेत्याने “सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा” हे गाणे गाऊन सोशल मीडियात चांगलीच खळबळ उडवून दिलीये.
#WATCH London: Founder of Pakistan’s Muttahida Qaumi Movement (MQM) party, Altaf Hussain sings ‘Saare jahan se acha Hindustan hamara.’ pic.twitter.com/4IQKYnJjfB
— ANI (@ANI) August 31, 2019
मागे एकदा ‘मुत्ताहिदा क़ौमी मूवमेंट’ या पक्षाचे संस्थापक अल्ताफ हुसैन यांनी म्हटले होते कि स्वातंत्र्यापासून पाकिस्तान सरकार आणि सैन्य काश्मीरच्या जनतेला फसवत आले आहेत. त्यामुळे काश्मिरी नागरिकांनी पाकिस्तानवर विश्वास ठेवू नये. याच हुसैन यांनी टेबल वाजवत ‘सारे जहाँसे अच्छा’ हे गाणे म्हणत खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीआयवर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
हुसैन हे कराची मधील मोठे राजकीय प्रस्थ असणारे नेते आहेत. परंतु त्यांना पाकिस्तान मधून हद्दपार करण्यात आले असल्याने ते सध्या लंडन मध्ये राहत आहेत. या पूर्वी देखील हुसैन यांनी पाकिस्तानला जगाचा कॅन्सर असल्याची उपमा दिली होती. त्यानंतर पाकिस्थान सरकारने त्यांच्यावर कारवाई देखील केली होती.