पाकची संगितकार मीशा शफीकडून 2 अब्जांचा दावा
नवी दिल्ली : पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफर सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत राहतो. दरम्यान, आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. पाकिस्तानी संगीतकार मीशा शफी यांनी सोशल मीडियावर ट्रोल झालेल्या अली जफरवर मानहानीचा दावा दाखल केला आहे. मीशा शफीने अलीवर तब्बल दोन अब्ज रुपयांचा दावा दाखल केला आहे. यापूर्वी मीशादम मी टू कॅंपेनदरम्यान जफरवर लैंगिक शोषणाचा आरोपही केला होता.
— Ali Zafar (@AliZafarsays) April 19, 2018
पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे. मीशाने अलीवर लाहोर न्यायालयात हा दावा दाखल केला आहे. यात तिने आपल्या प्रतिष्ठेला नुकसान पोहचवल्यामुळे 1 अब्ज आणि मानसिक छळासाठी 1 अब्ज असे मिळून 2 अब्जांची मागणी या दाव्यात केली आहे. दरम्यान, यापुर्वीदेखील मीशाने हा दावा दाखल केला होता त्यावेळी न्यायालयाने तिचा खटला फेटाळून लावला होता. गेल्या वर्षीमी टू कॅंपेनच्या वेळी मीशाने जाफरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. इंस्टाग्रामवरही त्याने याचा उल्लेख केला.