इस्लामाबाद – काश्मीर प्रश्नी पाकिस्तानकडून तालिबानची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्या असलेल्या महिलेने याबाबतचे सूतोवाच केले आहे.
पाकिस्ताच्या लष्कराचे आणि तालिबानचे घनिष्ठ संबंध असल्याचेही या नेत्या असलेल्या महिलेने मान्य केले आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तान तालिबानची मदत घेईल, असे वृत्तवाहिनीवरील एका चर्चेच्या कार्यक्रमात बोलताना पीटीआय पक्षाचे नेते नीलम इर्शद शेख यांनी म्हटले आहे. तालिबानचा आम्हाला पाठिंबा आहे आणि काश्मरबाबत ते आम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहेत, असे त्या म्हणाल्या.
मात्र दुसरीकडे तालिबानने काश्मीरच्या मुद्द्यावरुन भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे तालिबानने म्हटले होते.
नीलम इर्शद शेख यांनी तालिबानच्या पाठिंब्याबात वक्तव्य केल्यानंतर टिव्ही चॅनेचच्या निवेदिकाने शेख यांना “मॅडम तुम्ही काय म्हणत आहात ते तुम्हाला लक्षात येते आहे का ?’असा थेट प्रश्नही विचारला होता. हा कार्यक्रम संपूर्ण जगभर बघितला जाणार आहे. भारतातही हा कार्यक्रम बघितला जाणार आहे, याची त्याने शेख यांना आठवण देखील करून दिली.
मात्र शेख यांच्यावर त्याचा काहही परिणाम झाला नाही. त्यांनी आपला मुद्दा पुढे रेटला. तालिबानचा आम्हाला पाठिंबा आहे. कारण तालिबानला चुकीच्या पद्धतीने वागवले गेले आहे, असे त्या म्हणाल्या.