…तर भारतीय जवान मागे फिरायची संधी देणार नाही; राजनाथ सिंह यांचे पाकिस्तनाला खडेबोल

सुरत- जम्मू काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने चांगलाच तांडव सुरू केला आहे. त्यामुळे विविध पद्धतीने पाकिस्तान भारतविरोधी भूमिका घेत आहे. दरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याच मुद्यावरून पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या 122 सैनिकांच्या कुटुंबियांच्या सन्मान कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते.

यावेळी ते म्हणाले कि, ‘पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे थांबवले पाहिजे, अन्यथा पाकिस्तानचे तुकडे होणे अटळ आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले’. पाकिस्तानी घुसखोरांनी नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जवान त्यांना पुन्हा मागे फिरायची संधी देणार नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावत आहे, हे पाकिस्तानला सहन होत नाही. त्यामुळे पाकिस्तान जम्मू-काश्मीरचा मुद्दा वारंवार आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. असं देखील ते म्हंटले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.