नोश्की (पाकिस्तान) : सहा पत्नी आणि 54 मुले यांचा पिता असलेल्या 75 वर्षीय ट्रकचालकाचे निधन झाल्याने पाकिस्तानात हा एक चर्चेचा विषय झाला आहे. अब्दुल मजीद मंगल असे या ट्रकचालकाचे नाव असून तो पाकिस्तानातील नोश्की जिल्ह्यातील रहिवासी होता. वर्ष 2017 मध्ये पाकिस्तानमध्ये जनगणना सुरू असताना अब्दुल मजीद त्याच्या अनेक पत्नी आणि 50 हून अधिक मुलांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
अब्दुल मजीद यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची बहुतेक मुले 15 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. त्यांची सर्वात लहान मुलगी 7 वर्षांची आहे. त्यांनी एकूण 6 लग्ने केली होती. त्यांचे पहिले लग्न वयाच्या 18 व्या वर्षी झाले. घर चालवण्यासाठी तो ट्रक चालवण्याचे काम करत असे. म्हातारपण असूनही त्यांनी मृत्यूच्या पाच दिवस आधीपर्यंत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गाडी चालवली होती. मात्र आर्थिक अडचणीमुळे माजिदवर उपचार होऊ शकले नाहीत.
अब्दुल मजीद मंगल यांचा मुलगा शाह वली याने सांगितले की, 54 मुलांच्या गरजा भागवणे सोपे काम नव्हते, पण माझे वडील आयुष्यभर याच कामात गुंतले होते. मी माझ्या वडिलांना कधीही आराम करताना पाहिले नाही. आमच्यापैकी काहींनी बीए, काहींनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले आहे, पण आमच्याकडे रोजगार नाही. आर्थिक अडचणींमुळे वडिलांचा उपचार होऊ शकला नाही. माजिद यांचा मोठा मुलगा वली (37) हा देखील वडिलांप्रमाणे ट्रक चालवतो.
अब्दुल आणि त्याच्या कुटुंबाविषयीची बातमी पहिल्यांदा 2017 च्या जनगणनेदरम्यान समोर आली. जनगणनेच्या अहवालात माजिदच्या नातवंडांचा समावेश केला गेला असता तर ते 150 लोकांचे कुटुंब ठरले असते. अधिकाऱ्यांनी पूर्ण तपासणी केली असता त्यांची तारांबळ उडाली. सात खोल्यांच्या घरात माजिद आपल्या मुलांसह पत्नीसह राहत होता.
अब्दुल मजीदने त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना 54 मुले झाल्याचा कधीही पश्चाताप झाला नाही. त्यांच्याकडे कमाई करून कुटुंबाचे पोट भरण्याची ताकद नाही. त्यांना नेहमी आर्थिक चणचण भासत असल्याने अनेक मुलांना दूध मिळू शकले नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांचा मोठा मुलगा आता कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास मदत करत आहे.