विदेश वृत्त : पाकने अफगाणिस्तान सीमेवर तैनात केले लष्कर

इस्लामाबाद – अफगाणिस्तानातील स्थिती दिवेंसदिवस अधिक स्फोटक बनत चालल्याने पाकिस्तानने दक्षतेचा उपाय म्हणून अफगाण सीमेवरील चौक्‍यांवर लष्कर तैनात केले आहे.

पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री शेख रशिद अहमद यांनी सांगितले की सीमेवरील नाक्‍यांवर फ्रंटिअर कॉन्स्टेब्लरीच्या जवानांची जागा आता पाकिस्तानी लष्कर घेईल. सीमा भागातील अन्य निमलष्करी दलांना मागे बोलावून घेण्यात आले असून तेथे आता थेट लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत.

सरकारी पातळीवर अफगाणिस्तानातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अफगाणिस्तानातील संघर्षाचे लोण पाकिस्तानी हद्दीत किंवा पाकिस्तानी हवाई क्षेत्रात पसरू नये याची यानिमित्ताने दक्षता घेतली जात आहे.

तालिबान्यांना घाबरून सुमारे एक हजार अफगाण जवान ताजिकीस्तानच्या हद्दीत शिरले असून त्यांनी तेथे आश्रय घेतला आहे. अनेक अफगाणी नागरीकही तेथून पलायन करीत असून ते पाकिस्तानी हद्दीत शिरण्याचा धोका आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.