पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या सर्वांगीण आणि नियोजनबध्द विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबध्द असून बाणेर-बालेवाडीच्या सुनियोजित विकासा प्रमाणेच सूस गावाचा विकास केला जाणार असून त्यासाठीच सूस गावाची जबाबदारी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्ताने सुस व म्हाळुंगे या दोन गावांमध्ये माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष बालवडकर यांच्या तर्फे दररोज 20 पाण्याचे टॅंकर पुरविण्यात येणार अहेत. त्या निमित्ताने सुसगाव येथे महापौर मोहोळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
महापौर म्हणाले की, सुसगावाला सर्वाधिक सतावणारी कोणती समस्या असेल तर ती पाण्याची समस्या आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गावातील पाण्याची समस्या सोडवायची असेल तर पायाभूत सुविधा उभ्या करण्याची प्रामुख्याने गरज आहे. सुस सहित नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांचा समान पाणी योजनेमध्ये समावेश करण्यात यावा आणि पाइपलाईनचे व पाण्याच्या टाक्यांचे काम व्हावे यासाठी जातीनं लक्ष घालून सदर काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.
नगरसेवक किरण दगडे पाटील, राहूल कोकाटे, सरपंच अपूर्वार् निकाळजे, उपसरपंच , दिशाताई ससार, , दत्तोबा चांदेरे, माजी सरपंच मिरा देवकर, नारायण चांदेरे, अंकुश गाडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष रोहिदास चांदेरे, रासप अध्यक्ष अप्पासाहेब सुतार, गजानन चांदेरे.गणेश साळुंके,अमोल चांदेरे, सोपान चांदेरे, वसंत मामा चांदेरे,संपत साळुंके, सोमनाथ कोडेकर, समीर पारखी, अनंता चांदेरे, सतीश चांदेरे, मच्छिन्द्र चांदेरे, हरिभाऊ चांदेरे, अंकुश ससार, विठ्ठल शेवाळे, महेंद्र ससार, महेश सुतार, सरचिटणीस भा.यु.मो.पु. शरद भोते, युवा नेते अनिल बापू ससार, शंकर चांदेरे, मंदार राराविकर, ॲड. अशिष ताम्हाणे, प्रकाश तपकीर, नितीन रनवरे, प्राजक्ता रनवरे, रिमा सोमय्या, सुसगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ, भाजपा पदाधिकारी व सभासद यावेळी उपस्थित होते. यांच्यासह सूस गावचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.