Coronavirus : देशात दिवसभरात 39 हजार 97 लोकांना कोविडची लागण; 546 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत कोविडचे 39 हजार 97 नवीन रूग्ण दाखल झाले असून याच अवधीत देशभरात एकूण 546 लोक कोविडमुळे दगावल्याने देशातील एकूण कोविड मृतांची संख्या 4 लाख 20 हजार 16 इतकी झाली आहे.

देशातील सक्रिय कोविड रूग्णांची संख्या आता 4 लाख 8 हजार 977 इतकी झाली आहे. सक्रिय रूग्णांचे हे प्रमाण 1.34 टक्के इतके नोंदवले गेले आहे. काल दिवसभरात एकूण 16 लाख 31 हजार 266 जणांच्या कोविड टेस्ट केल्या गेल्या.

दरम्यान देशात बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या आता 3 कोटी 5 लाख 3 हजार 166 इतकी झाली आहे. गेल्या 23 जून रोजी करोना झालेल्या रूग्णांच्या संख्येने 3 कोटींचा टप्पा ओलांडला होता. देशातील लसीकरण झालेल्यांची संख्या आता 42 कोटी 78 लाख इतकी झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.