#CWC19 : …तरच पाकिस्तान उपांत्य फेरी गाठू शकेल, हे आहे समीकरण

लंडन – इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर उपांत्य फेरी गाठणे हे पाकिस्तानसाठी स्वप्नरंजनच झाले आहे. आज अखेरच्या लढतीत त्यांना बांगलादेशसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध सामोरे जावे लागणार आहे. अशक्‍यप्राय विजय मिळविला तरच त्यांना बाद फेरीची संधी आहे.

न्यूझीलंडचे सर्व नऊ सामने संपले असून त्यांचे 11 गुण आहेत तर त्यांची धावगती +0.175 आहे. पाकिस्तानने 8 सामन्यांमध्ये 9 गुण मिळविले आहेत व त्यांची धावगती -0.792 आहे. बांगलादेशवर त्यांनी विजय मिळविला तर त्यांचे 11 गुण होतील. साहजिकच बाद फेरीतील चौथा संघ ठरविण्यासाठी सरस धावगतीचा विचार केला जाईल.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 350 धावांपेक्षा जास्त धावा केल्यास त्यांना बांगलादेशला 311 धावांनी पराभूत करावे लागेल. जर त्यांनी 400 पेक्षा अधिक धावा केल्यास त्यांना हा सामना 316 धावांनी विजय मिळवावा लागेल. या गोष्टी पाकिस्तानला साध्य करता येणे अशक्‍य आहे. नाणेफेक जिंकून बांगलादेशने फलंदाजी घेतली तर त्याचवेळी पाकिस्तानचे आव्हान संपल्यात जमा होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.