सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये चॅलेंजेसची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये मध्यंतरी आलेले आईस बकेट चॅलेंज असोत की फ्लिप द बॉटल चॅलेंज असो अशा सर्वांनाच नेटकरी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देताना दिसतात. असे चॅलेंज स्वीकारून ते पार पाडतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्याची प्रथा बॉलीवूडकरांमध्ये देखील सुरू झाली असून यामध्ये अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, वरून धवन असे बॉलीवूड सुपरस्टार्स आघाडीवर असल्याचे दिसून येते.
I couldn’t resist ?#BottleCapChallenge
Inspired by my action idol #JasonStatham, I will repost/retweet the Best I see, come on Guys and Girls get your Bottle out and your Legs in the Air, Let’s Do This ?? #FitIndia #WednesdayMotivation pic.twitter.com/RsDYDWhS5n
— Akshay Kumar (@akshaykumar) July 3, 2019
अशातच आता सोशल मीडियावर एक नव्या प्रकारचे चॅलेंज आले असून या चॅलेंजचे नामकरण #BottleCapChallenge असं करण्यात आलं आहे.बॉलिवूडचे म्हणाल तर सर्वप्रथम अक्षय कुमारने हे चॅलेंज स्वीकारले. चॅलेंज स्वीकारले असून ते पूर्ण करतानाचा व्हिडिओ त्याने आपल्या ट्विटर खात्यावर टाकला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार समोर ठेवलेल्या बॉटलचे झाकण किक मारून उडवताना दिसत आहे.
अक्षयच्या पाठोपाठ अभिनेता टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल, कुणाल खेमु आदींनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. या सर्वांनी चॅलेंजचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हॉलिवूड स्टार इरोलसन ह्युज याने या चॅलेंजची सुरुवात केली. त्यानंतर त्याने जेसन स्टेथमला हे चॅलेंज दिले. याशिवाय हॉलिवूड स्टार जॉन मेयरने सुद्धा या चॅलेंजचा व्हिडिओ शेअर केला आहे. हॉलिवूड नंतर आता बॉलिवूडमध्ये या चॅलेंजची क्रेझ वाढत आहे.
या पोस्ट बरोबर लिहिलेल्या संदेशांमध्ये अक्षय कुमारने आपण सदर चॅलेंज आपला ॲक्शन आयडॉल जेसन स्टेथम याच्यापासून इन्स्पायर होऊन पूर्ण करत असल्याचं सांगितलं आहे.